Tuesday, November 30, 2010

मराठा सेवा संघला २० वर्षे पूर्ण ....

1st sept 2010 - मराठा सेवा संघला २० वर्षे पूर्ण .... मराठा सेवा संघाची वाढ अशीच होत राहो.. बहुजनवादी दृष्टीकोनातून समाजकार्य असेच पुढे चालू राहो.. हार्दिक शिवेच्छा...

1 comment:

Kavita Sagar Diwali Ank 2013 said...

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी डॉ. सुनील पाटील

(जयसिंगपूर) जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी जयसिंगपूर येथील प्रतिथयश साहित्यिक संस्था कवितासागरचे कार्यकारी संचालक, लेखक, मुक्त पत्रकार, अनुवादक, संपादक, प्रकाशक व ग्रंथ वितरक डॉ. सुनील पाटील यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कोल्हापूर येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. सुनील पाटील यांना जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र जे. बी. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले असून सदर नियुक्ती पुढील तीन वर्षासाठी राहील अशी माहिती प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील यांनी दिली.

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेची विभागीय कार्यकारिणीची बैठक कोल्हापूर येथील संभाजीनगरमध्ये झाली. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मला पाटील, समन्वयक गिरीश लक्ष्मण जाधव, विभागीय सचिव राजेंद्र बळवंत यादव यांच्यासह जिल्हा सचिव प्रमोद सुभाष पाटील व अन्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. या बैठकीत कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी एकमताने डॉ. सुनील पाटील यांची निवड करण्यात आली.

शिरोळ तालुक्यातील साहित्यिकाला प्रथमच कार्याध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. मराठी भाषा व साहित्य यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व विकासासाठी प्रयत्न करणे, मराठी भाषा व साहित्य यांच्या अभ्यासास उत्तेजन देणे, मराठी वाचकांची वाड्‌.मयीन अभिरुची वृध्दिंगत करणे आणि मराठी साहित्यिकांच्या हितासाठी व कल्याणासाठी झटणे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उद्दिष्ट ठेवून व्यापक कार्य करण्यासाठी डॉ. सुनील पाटील कार्यरत आहेत.

जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेद्वारे उपेक्षित साहित्य आणि वंचित साहित्यिकांना वाव देण्याचे कार्य केले जाते. मराठा -बहुजन समाजातील नवोदित साहित्यिकांना स्वतंत्र विचारपीठ देणाऱ्या परिषदेकडून अखिल भारतीय पातळीवर साहित्य परिषदेची अनेक साहित्य झाली असून, पुढील साहित्य संमेलने महाराष्ट्राबाहेर तर भविष्यातील काही संमेलने देशाबाहेर भरविण्याचा प्रयत्न आहे. गावपातळीवर साहित्य परिषदेचे विचार, कार्य पोचावे हा साहित्य परिषदेचा हेतू असून, मराठा-बहुजन समाजाला साहित्याकडे वळविणे आणि साहित्यिक तयार करणे व त्यासाठी देश, विभाग, जिल्हा, तालुका, गावपातळीवर कार्यशाळा संमेलने घेण्याचे परिषदेच्या कार्याचे स्वरूप आहे, असे डॉ. सुनील पाटील यांनी स्पष्ट केले असून परिषदेचे सभासद होवू इच्छिणा-या कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यिकांनी ९९७५८७३५६९ या क्रमांकावर किंवा sunildadapatil@gmail.com या ईमेल वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या निवडीबद्दल डॉ. सुनील पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.






छायाचित्र: जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र डॉ. सुनील पाटील यांना देतांना राजेंद्र यादव, जे. बी. शिंदे, डॉ. निर्मला पाटील आदी.