Wednesday, June 4, 2008
मराठा सेवा संघाचे १३ वे
अधिवेशन अमरावतीला ...
पुण्यातील १२ व्या भव्य अधिवेशना नंतर आता अमरावती येथे १३ वे भव्य अधिवेशन .....हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा.
मराठा तितुका मेळवावा...
(पुरुषोत्तम खेडेकर) मराठा सेवा संघाचे १२ वे राष्ट्रीय अधिवेशन आज व उद्या पुण्यातील लक्ष्मीबाई शिंदे हायस्कूलच्या राजर्षी शाहू मैदानावर होत आहे. मराठा समाजाची सद्यःस्थिती व आव्हाने याचा आढावा घेणारा हा लेख. .......मराठा सेवा संघ हे नाव आज जगभरातील बहुतांशी जागृत मराठा व्यक्तीस; तसेच बहुजन समाजातील परिवर्तनशील चळवळीत काम करणाऱ्यांस परिचित आहे. संघामार्फत विविध समाजप्रबोधनाचे उपक्रम, सेवा संघाच्या विविध ३० कक्षांच्या माध्यमातून सुरू असलेले कार्यक्रम, समविचारी संघटनांचे पाठबळ यामुळे सेवा संघाचे कार्य विस्तार पावते आहे. मराठा समाज राजकीय क्षेत्रात मोठ्या संख्येने वावरत असला, तरी या समाजाची वैचारिक आणि सामाजिक ठेवण बदलण्याचे काम संघामार्फत सुरू आहे. समाजाच्या सांस्कृतिक परंपरा उजळविणे, त्यांचा नव्याने अर्थ लावणे यासाठी संघ प्रयत्नशील आहे. संघाच्या प्रयत्नातूनच राजमाता जिजामाता यांचा पहिला पुतळा सिंदखेडराजा येथे उभा राहिला. शिवजन्मस्थान असलेला शिवनेरीसह राजगड, पुरंदर या किल्ल्यांच्या जीर्णोद्धाराचे काम सरकारने हाती घेतले आहे. राज्य सरकार शिवसृष्टी उभारण्याचा मनोदय व्यक्त करीत आहे. शासकीय प्रकाशनांच्या माध्यमातून या परंपरा नव्याने मांडल्या जात आहेत. ही कामे होत असले, तरी अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. समाजासमोर विविध आव्हाने आहेत. जागतिकीकरणाच्या रेट्यात मराठा समाजाला आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवावी लागेल. त्यासाठी कालबाह्य रुढींचा, समजुतींचा त्याग करावा लागेल. त्यासाठी मराठा सेवा संघ झटत आहे. राजसत्ता ही सर्व कुलपांची किल्ली आहे. मराठ्यांच्या हाती महाराष्ट्राची आणि देशाची सत्ता असल्याची चर्चा सर्वत्र होते. मात्र ही चर्चा दिशाभूल करणारी आहे. प्रशासन, न्याय व्यवस्था, प्रसारमाध्यमे, अर्थसत्ता, शिक्षणसत्ता या महत्त्वाच्या सत्तांपासून हा समाज लांब आहे. या क्षेत्रातही कर्तबगारी उंचावल्याशिवाय मराठा समाजाची सर्वांगीण प्रगती शक्य नाही. आयएस, आयपीएस या सेवांत मराठा तरुण कमीच आहेत. हे सर्व घडण्यासाठी समाजाने प्रगत तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. जगातील मुले आता संगणकाची भाषा बोलत आहेत. ही भाषा मराठा समाजानेही आत्मसात केली पाहिजे. प्रगतीतील समाजातील युवक नोकऱ्यांवर लाथ मारून स्वतःचे उद्योग उभे करीत आहेत. तर मराठा युवक अजूनही किरकोळ नोकऱ्यांसाठी रोजगार केंद्रासमोर रांगा लावत आहेत. मराठा तरुणी व्रतवैकल्ये, उपवास शोधून अंधश्रद्धांच्या साम्राज्यात वावरत आहेत. हे सर्व बदलावे लागेल. शेतीला पूरक व्यवसाय शोधा, असे अनेक जण सांगतात. माझा सल्ला वेगळा आहे. शेती हाच पूरक व्यवसाय म्हणून स्वीकारावा, असे माझे मत आहे. बहुतांश मराठा समाज हा शेतकरी आहे. उत्पादन खर्चावर आधारित मालाला भाव मिळेल, याची खात्री नसल्याने शेतकरी व पर्यायाने मराठा समाज आर्थिक अधोगतीकडे सरकतो आहे. विदर्भात गेल्या वर्षभरात १३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात १२४८ मराठा शेतकरी होते. हे आर्थिक शोषण थांबवायचे असेल तर शेतीला पर्याय शोधल्याशिवाय मार्ग नाही. जगाचा पोशिंदा म्हणायचे आणि त्यालाच आत्महत्या करण्यास भाग पाडायचे, अशी येथील रीत झाली आहे. त्यामुळे शेती सोडून इतर व्यवसाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठा समाजाचे धार्मिक शोषण थांबवून त्यासाठी खर्च होणारा पैसा हा मानसिक व बौद्धिक ताकद वाढविण्यासाठी खर्च करायला हवा. त्यासाठी शिवधर्माची स्थापना करण्यात आली. त्याला मोठा प्रतिसाद राज्यभरातून मिळाला. कर्मकांडे व अंधश्रद्धा यावर मराठा समाजाचा मोठा पैसा खर्च होत आहे. हा खर्च थांबविण्यासाठी शिवधर्माचे प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजाची प्रगती व्हावी यासाठी शास्त्रशुद्ध आखणी करून काम सुरू आहे. त्यासाठी विविध विभागांत काम करणाऱ्या ३१ कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, राजर्षी शाहू शिक्षण परिषद, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद अशांचा त्यात समावेश आहे. नवीन आव्हानांचा स्वीकार करण्यासाठी परस्परांतील मतभेद कमी करावे लागतील. पंचकुळी, सप्तकुळी, शहाण्णव कुळी, कुणबी, पाटील, आगरी, देशमुख, घाटावरचे, घाटाखालचे अशा अनावश्यक पोटभेदांमुळे समाजाचे नुकसान झाले आहे. हे मतभेद मिटविण्यासाठी तरुण-तरुणींनी पुढे येण्याची गरज आहे. मराठा सेवा संघाची त्यांना साथ लाभेल. महाराष्ट्रात संख्येने सर्वाधिक असूनही या समाजाची अवस्था बिकट होता कामा नये. आपल्या शौर्याचा, पराक्रमाचा पोकळ अभिमान त्यासाठी सोडावा लागेल. मराठा सेवा संघाच्या पुण्यात आजपासून होणाऱ्या अधिवेशनात समाजाला पुढे जाण्याची दिशा यात निश्चितपणे मिळेल. त्यासाठी मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे. - पुरुषोत्तम खेडेकर
शेतजमिनी काढून घेतल्यास मराठ्यांचा स्वाभिमान संपेल - माजी न्यायमूर्ती कोळसे
ता.२३ - "" विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) व कंत्राटी शेतीच्या नावाखाली शेतजमिनी काढून घेतल्यास मराठ्यांचा स्वाभिमान संपुष्टात येईल,'' असे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. ""छत्रपती शिवाजी महाराज व जिजामातेची बदनामी करणाऱ्यांचे हात कलम करावेत,'' असेही ते म्हणाले.
शेतजमिनी काढून घेतल्यास मराठ्यांचा स्वाभिमान संपेल - माजी न्यायमूर्ती कोळसे पाटीलपुणे, ता.२३ - "" विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) व कंत्राटी शेतीच्या नावाखाली शेतजमिनी काढून घेतल्यास मराठ्यांचा स्वाभिमान संपुष्टात येईल,'' असे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. ""छत्रपती शिवाजी महाराज व जिजामातेची बदनामी करणाऱ्यांचे हात कलम करावेत,'' असेही ते म्हणाले.
मराठा सेवा संघाच्या बाराव्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, जिल्हाध्यक्ष विजयकुमार ठुबे व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ लेखिका सरोजिनी बाबर व बांधकाम व्यावसायिक सतीश मगर यांचा "मराठा विश्वभूषण पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. सरोजिनी बाबर यांच्या वतीने त्यांच्या भगिनी कुमुदिनी पवार यांनी पुरस्कार स्वीकारला. श्री. कोळसे पाटील म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पूर्वजांना दिलेल्या जमिनी बळकावण्याचा भांडवलदारांचा डाव आहे. संवेदना संपलेले राजकीय नेते त्यांना मदत करत आहेत. जमिनी गेल्यास हातात काहीच राहणार नाही. त्यामुळे छत्रपतींनी दिलेल्या जमिनींवर पाय ठेवण्याची भांडवलदारांची हिंमत होणार नाही, अशी कृती करण्याची गरज आहे.'' मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ते म्हणाले, ""घटनेमध्ये शैक्षणिक व सामाजिक मागास असलेल्यांनाच आरक्षणाची तरतूद आहे. घटनेत बदल करण्यासाठी जनशक्तीचा प्रचंड रेटा आवश्यक आहे. त्यासाठी मागासवर्गीयांसह बहुजनांना एकत्र करून आपल्या मागणीचा पाठपुरावा केला पाहिजे.'' ""जातीच्या संघटना जरूर कराव्यात. पण ते करताना कोणाचा द्वेष करण्याची गरज नाही,'' असे ते म्हणाले. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाशी संबंधितांचा सत्कार करताना लाज वाटली पाहिजे,' अशी टिप्पणी त्यांनी या वेळी केली. आरक्षणाबाबत आश्वासन दिल्याप्रमाणे सहा महिन्यांत निर्णय घेऊ, असे सांगून डावखरे म्हणाले, ""देशातील व राज्यातील मराठा नेतृत्वाने दुसऱ्यांना न्याय देताना स्वत: च्या समाजावर अन्याय करू नये. मराठ्यांची प्रबळ संघटनेची आवश्यकता आहे.'' श्री मगर म्हणाले, ""प्रगतीसाठी मराठा समाजाने एकत्र आले पाहिजे.'' अधिवेशनातील ठराव * मराठा समाजाचा "ओबीसी'त समावेश करण्याचे आश्वासन सहा महिन्यांत पूर्ण करावे. * शेतकऱ्यांची कर्जे माफ करून आत्महत्या थांबविण्याचा प्रयत्न करावा. * सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ अल्प, अत्यल्प भूधारकांना मिळावा. * भांडारकर संस्थेवर हल्ला प्रकरणी संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांवरील खटले मागे घ्यावेत. * शिवराय व जिजाऊंच्या बदनामीप्रकरणी भांडारकर संस्थेवर प्रशासक नेमावा. एकत्र येत नाही, हीच खंत ""आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाज सक्षम आहे. पण सत्तेवर असलेल्या मराठा नेत्यांनी आमच्यावर अन्याय करू नये. आमच्या तलवारी तुमच्या मानेवर पडू नयेत, यासाठीच आम्ही त्या म्यान केल्या आहेत,'' असे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ""मराठा समाजाचे नेते, मंत्री समाजाशी नाही तर पक्षाशी प्रामाणिक राहतात. त्यामुळे त्यांनी समाजासाठी जीव देण्याची भाषा करू नये. लाचार मंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षाही नाहीत. यानंतरही मराठा समाजातील व्यक्ती गुणदोषांसह आम्ही स्वीकारल्या आहेत. मराठा सेवा संघाचा हेतू कोणाचा द्वेष करण्याचा नसून सत्यकथनाचा आहे. समाजाने शिक्षणाची कास धरावी, असा प्रयत्न आम्ही करत आहोत. मागासवर्गीय व मुस्लिमांना आम्ही एकत्र घेतल्यास सत्ता आमच्याकडेच येईल. पण एकत्र येत नाही, ही खंत आहे.''
""मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास "मराठा विरुद्ध दलित' हा संघर्ष कमी होऊन नवनिर्मितीच्या दिशेने समाजाची वाटचाल सुरू होईल,'' असे मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांनी आज येथे सांगितले. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लढा करून यश संपादन करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलच्या प्रांगणात उभारलेल्या शाहूनगरीत मराठा सेवा संघाच्या बाराव्या अधिवेशनाच्या उद्�घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला वीर बाजी पासलकर यांचे वंशज ज्ञानोबा पासलकर, कान्होजी जेधे यांचे वंशज युवराज, हिरोजी भोसले यांचे वंशज सचिन व राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या शिक्षिका राजश्री भोसले यांचा सत्कार संत तुकाराम महाराजांची प्रतिमा व मानपत्र देऊन करण्यात आला. संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, तमिळनाडूतील तंजावर येथील सरदार घराण्यातील प्रभावती गाडे रावसाहेब काकू, लेखिका कुमुदिनी पवार, ग्रामीण पोलिस अधीक्षक विश्žवास नांगरे पाटील, कर्नाटकचे राजाराम गायकवाड, जपानच्या टोकियो शहरातील व्यावसायिक बाळासाहेब देशमुख, "संभाजी ब्रिगेड'चे अनंत चोंदे, जयश्री शेळके, सारिका भोसले, आमदार शरद ढमाले तसेच दीपक मानकर, रवींद्र माळवदकर, राजेंद्र कोंढरे, पांडुरंग बलकवडे, अभिनेते अशोक समर्थ उपस्थित होते. गोरे म्हणाले, ""मराठा सेवा संघाने हाती घेतलेल्या समाज जागृतीमुळे मराठा-मराठेतर संघर्षाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होत आहेत. अंधश्रद्धा, रूढी-परंपरेतून समाज मुक्त होत आहे. मात्र, आम्ही अजूनही अस्वस्थ आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यास तरुणांना प्रोत्साहन देत असलो तरी बेरोजगारीचा प्रश्žन मोठा आहे. मराठा समाजासाठी सहा महिन्यांत आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यानुसार आरक्षण लागू करावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांना निवेदने देण्याची मोहीम राबविण्यात येईल.'' मराठा सेवा संघाच्या कार्याचा आढावा घेताना ते म्हणाले, ""मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले तरी त्यांचा इतिहास धार्मिक बंधनात अडकला. त्यामुळे मराठ्यांचे कर्तृत्व पुढे आले नाही. इतिहास लेखनातील हा अन्याय व कलंक पुसून सत्य इतिहास मांडण्याचे काम सेवा संघ करत आहे. धार्मिक गुलामगिरी, वैदिक धर्माच्या बेड्यांतून बहुजन समजाला मुक्त करून शिवधर्माचा स्वीकार करून त्यांना चैतन्यदायी मार्गावर नेत आहोत. येत्या ता. १२ जानेवारीला हजारो जण शिवधर्माची दीक्षा घेणार आहेत. भटजींना न बोलविता होणारे विवाह; तसेच सण, उत्सवावरचा खर्च वाचवून शिक्षण व उद्योगधंद्यासाठी हा पैसा वापरण्यास झालेली सुरवात हे संघाच्या कामाचे यश आहे. जगभरातील मराठा समाजातील व्यक्तींपर्यंत हे कार्य पोचविण्याचे काम सुरू आहे. विकृत इतिहासाला जबाब देण्याचे काम "संभाजी ब्रिगेड' करत आहे.'' राजाराम गायकवाड म्हणाले, ""शहाण्णव, ब्याण्णव कुळी असा भेदभाव करणे समाजासाठी घातक आहे. मराठा सेवा संघामुळे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समोर येत असून, त्यानुसार कर्नाटकातील मराठी समाजाने बदल करण्यास सुरवात केली आहे.'' प्रास्ताविक भाषणात विजयकुमार ठुबे म्हणाले, ""मराठा समाजाने एकत्र येऊन स्वत:चा विकास करणे काळाची गरज आहे. मराठा सेवा संघ परिवर्तनवादी चळवळ झालेली आहे.'' लाल महाल येथील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवून तेथे शहाजी महाराजांचा पुतळा उभारावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. श्रीमंत कोकाटे व जयश्री शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. दोन दिवसांच्या अधिवेशनाला राज्यभरातून महिला व कार्यकर्ते आले आहेत.
"शिवसृष्टी' येत्या वर्षभरात "
"पुण्यात येत्या वर्षभरात शिवसृष्टी उभारण्यात येईल,'' असे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बापू पठारे यांनी सांगितले. दीपक मानकर यांनी ही मागणी केली होती. "पालिकेतर्फे यासाठी जागा देण्यात येईल; तसेच पालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल,' असेही पठारे यांनी सांगितले.
maratha seva sangh, sambhaji brigade, jijau brigade, shivdharma

Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
जगभरात सगळ्या मराठ्या पर्यन्त पोचलेल्या मराठा महासंघाला साधि एक comment नाही दिली कोणी..???
म्हणून शेवटी नराहुन मला लिहावे लागत आहे...
बहुतेक सुशिक्षित मराठ्यांनी खेडेकर साहेबांच् लिखाण वाचाल असाव म्हणून आपला लेख वाचायची कोणाची हिंमत झाली नसावी.....

Post a Comment